0
पुणे | आमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं लोकेशन अखेर सापडलं आहे. ते नगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर असल्याची माहिती आहे.
आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार गायब झाले होते. त्यांनी आपले तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींचे फोन स्वीच ऑफ केले होते. शरद पवार यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊऩ अजित पवार अस्वस्थ असल्याचं सांगितलं. संबंध नसताना शिखर बँक घोटाळ्यात माझं नाव घेतल्यानं ते अस्वस्थ झाल्याचं पवारांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार दुपारी बारामती आणि पुण्याच्या परिसरात होते. सायंकाळी ते अंबालिका कारखान्यावर गेले. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, असं कळतंय.

Post a Comment

 
Top