0
जेजुरी - जेजुरीतील महाराष्ट्र बँकेत सध्या अंदाधुंद कारभार चालू असुन,  बँकेतील स्टाफ अमराठी असल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गाची कुचंबणा होत आहे, महाराष्ट्र बँक ही महाराष्ट्राची बँक असल्याने त्या ठिकाणी किमान मराठी बोलता येणारे कर्मचारी असावेत अशी अपेक्षा आहे आणि नागरिकांसाठी बँकेची वेळ सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजता असताना बँकेत माञ  दुपारी अडीच नंतर येणाऱ्या ग्राहकांना माञ परत पाठवले जाते, केंद्र  सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहेत,  मुद्रा लोन, पेन्शन योजना,  सुकन्या योजना राबविणे गरजेचे असताना कामाचा त्रास नको म्हणून सदर सरकारी योजनांची माहिती लोकांना दिली जात नाही,  त्यामुळे सदर योजनांपासून नागरीक वंचित राहत आहेत असा आरोप करीत , यामध्ये सुधारणा न झाल्यास भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अलका शिंदे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

Post a Comment

 
Top