0
 सोलापुर ( प्रतिनिधी ) - राज्यसरकारच्या किल्ले गडकोट भाड्याने देण्याच्या आदेशाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने आसरा चौक येथे सरकारच्या विरोधात  भीक मांगो आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अठरापगड जाती धर्माच्या मावळ्यांच्या बलीदानाचा अपमान  सहन करणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष  श्याम कदम यांनी दिला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली
  यावेळी शाम कदम म्हणाले गड किल्ले महाराष्ट्राची अस्मिता आहेत शिवाजी महाराज यांच्या चरण स्पर्श असलेला प्रत्येक किल्ला पवित्र आहे मी भाड्याने देऊ देणार नाही गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेऊ पाहत आहे संभाजी ब्रिगेड गड-किल्ल्यांचे हॉटेल कदापि होऊ देणार नाही  सरकार धनदांडगे उद्योगपती साठी इतिहास नामशेष करायला निघाले आहेत  मुख्यमंत्र्यांनीआदेश त्वरित मागे घ्यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके सीताराम बाबर आशुतोष माने शफीक शेख सुखदेव जाधव भीमा बनसोडे ओंकार यादव नागेश शिंदे महेश माने रमेश लोखंडे आकाश कदम गोविंद चव्हाण बसवराज आळंदे अजित शेटे सोमनाथ पात्रे चेतन चौधरी महेश भंडारे कृष्णा कदम विजय बिल्लेगुरू लिंगराज लोणी रुपेश ठाकूर नवनाथ देठे सचिन देशमुख प्रफुल्ल चव्हाण राहुल सावंत विकास सावंत सोहेल शेख इलियास शेख अनिल कोकाटे अजित जाधव मालू भंडारे अन्वर शेख समीर पठाण सैपन शेख कुतुब अन्वर डीबी भोसले ईत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top