0
अंबड ( प्रतिनिधी ) -  जालना जिल्ह्यातील भार्डी शिवारात सापडला असून सदर मृतदेह हा बळीराम शंकर ढवळे वय ३२ रा.विहमांडवा ता.पैठण येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
अंबड तालुक्यातील भार्डी येथे रविवारी चार वाजेच्या दरम्यान भार्डी येथील एक शेतकरी शेतामध्ये जात असतांना जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या पाण्यामध्ये प्रेत आढळले.
यांची माहिती गोंदी पोलिसांना कळवली या घटनेची माहिती कळताच गोंदी चे सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर हे कॉ दिलीप दिवटे,गायके, यांनी घटनास्थळी धाव घेऊन ते प्रेत पाण्यातून वर काढले सदर प्रेतची ओळख पटली असून बळीराम शंकर ढवळे वय ३२र्ष रा.विहमांडवा ता.पैठण येथील असल्याचे सदर प्रेत हे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
इसम हा शनिवारी दुपारी डाव्या कालव्याजवळच वहिमांडवा येथील आसलेल्या स्व:ताहाच्या शेताकडे आलेला आसतांना डाव्या कालव्यात वाहुन अबंड तालूक्यात आज रोजी डाव्या कलव्यात मयत हा तरंगतांनी नागरिकांना दिसला यावेळी मयताची ओळख पडताच विहामांडवा येथील नातेवाईककांना कळवण्यात आले आसून, मृत्यूचे कारण अद्यापही कळून आले नसून,शवविच्छेदन झाल्या नंतर गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात येणार आहे असे गोंदी पोलिसांनी सागितले. मयताच्या पश्चात पत्नी,तीन मुली व एक मुलगा आहे. ( प्रतिनिधी - गणेश जाधव )

Post a Comment

 
Top