0
सासवड ( प्रतिनिधी ) - सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र पदविका महाविद्यालयात राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उदघाटन मा.श्री .विजय कोल्हे - सहायक सहसंचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये मा.श्री.कोल्हे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थाना फार्मसी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थाना  भारतीय परकीय नामांकित औषधनिर्माणशास्त्र कंपन्यांमध्ये उपलब्ध  असलेल्या रोजगार निर्मितीच्या संधी, फार्मसी क्षेत्राला उद्योग जगामध्ये असणारे महत्वाचे स्थान तसेच त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले आणि महाराष्ट्र राज्य तंत्र  शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांनसाठी राबविण्यात येण्याऱ्या  विविध योजनाची माहिती देऊन औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याबाबतची माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.आर.वाय.पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमानंतरच्या संधी बाबत माहिती मिळावी या हेतूने  या कार्यशाळेचे  आयोजन केलेले असल्याचे सांगितले आणि फार्मसी क्षेत्रातील विविध संधीबद्दल माहिती दिली व महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले. सदर कार्यशाळेमद्ये  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय व आतंरराट्रीय औषध निर्मिती कारखान्यात असणाऱ्या तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले होते. मा.सौ.स्मिता ठुबे - सिनिअर सायंटिफिक अँन्ड मेडिकल रायटर, मा.श्री.अभय ठुबे - सेल्स एक्सएकटीव्ह, मा.श्री.राजेंद्र अमृतकर - एरिया  बिजनेस  मॅनेजर अल्केम लॅब्रॉटरीज, मुंबई, मा.श्री.समीर मोहिते - असिस्टन्ट मॅनेजर, सिप्ला फार्मासुटिकल्स या कार्यशाळेमद्ये परभणी, लातूर, सातारा, सांगली व पुणे जिल्यातील प्रथम व दुतिय वर्ष पदविकेमधील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते.  कार्यशाळेचे आयोजन प्रा..श्वेता फडतरे यांनी केले व त्यांना सहकार्य प्रा.विशाखा गायकवाड, प्रा.सागर भिसे, प्रा.दीपाली जगताप, प्रा. हनुमंत पाटील व प्रा.मंजुश्री पानसरे यांनी केले. तसेच या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु.शुभांगी कामठे, कु.अपर्णा बिरमले, कु.उल्हास नाळे व कु.दिव्या यांनी केले.

Post a Comment

 
Top