0
सासवड ( प्रतिनिधी ) - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट डे मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात आला. औषध वितरणा पासून रुग्ण समुपदेशनापर्यंत ! औषध साक्षरतेपासून रुग्नांच्या आरोग्य सेवेपर्यंत ! औषध निर्माणापासून ते सामाजिक बांधिलकी जपण्यापर्यंत औषध आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या जोरावर समाजाच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाचे योगदान देत असतो अशा फार्मासिस्टचे स्मरण करण्यासाठी जागतिक पातळीवर २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. फार्मासिस्ट हा समाजाच्या आरोग्य सेवेमधील डॉक्टरांइतकाच महत्वाचा व अविभाज्य घटक असून डॉक्टर व रुग्ण यांच्यामधील महत्वाचा दुवा आहे. तसेच समाजाचा पर्यायाने राष्ट्राचा विकास हा आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून असतो असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.आर.वाय.पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. सदर कार्यक्रमास मा.सौ.सुषमा भोसले - वाघिरे महाविद्यालय, सासवड, मा.श्री.बंडूकाका जगताप - सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, मा.श्री.नंदकुमार जगताप - अध्यक्ष - पुरंदर फार्मासिस्ट व केमिस्ट असोसिएशन उपस्थित होते. मा.सौ.सुषमा भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये जागतिक फार्मासिस्ट  दिनाच्या शुभेच्छा देऊन आरोग्य उत्तम रित्या जपण्याची जबाबदारी फार्मासिस्ट उत्तम प्रकारच्या औषधाची निर्मिती करून करीत असतात असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.
तसेच महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी डेंगू या आजाराबाबत जनजागृती पथनाट्य सादर करून औषधनिर्माता करिता असणारी शपथ घेऊन जागतिक फार्मासिस्ट दिनानिमीत्त्य डेंगू या आजाराबाबत जनजागृती केली. आयोजित केलेल्या रॅलीला मा.सौ.सुषमा भोसले - प्राचार्य वाघिरे महाविद्यालय, सासवड, मा.श्री.बंडूकाका जगताप - सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, मा.श्री.नंदकुमार जगताप - अध्यक्ष - पुरंदर फार्मासिस्ट व केमिस्ट असोसिएशन यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. सदर रॅली सासवडमधील विविध भागामध्ये जाऊन डेंगू या आजाराबाबत माहिती देऊन सदर आजाराची कशी काळजी घ्यायची याबाबत माहिती देणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा.वैभव शिळीमकर व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.अमोल काळे यांनी केले होते. तसेच सूत्रसंचालन प्रा.निलेश भोसले व आभार प्रदर्शन प्रा.मंजुश्री पानसरे  यांनी केले.

Post a Comment

 
Top