0
सासवड ( प्रतिनिधी ) - शेतीमधील सर्व संसाधन उपलब्ध असताना देखील बैलांचे संगोपन संरक्षण करणाऱ्या बळीराजासाठी व पशुधन व मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी   बैलपोळ्याच्या निमित्ताने कै. सदाअण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने पुरंदर व हवेली  तालुक्यातील सुदृढ उत्कृष्ठ  बैलजोडी स्पर्धा ठेवलेली आहे.
  28 सप्टेंबर या तारखे पर्यंत आपल्या बैलजोडीचे  एक समोरून व दोन साईड ने असे तीन आकर्षक फोटो, आपला पूर्ण पत्ता व्हाट्सअप्प वर लिहावा अक्षय पुराणिक +91-7038972269  किवा https://bit.ly/2ki3J02
या लिंकवर माहिती भरून व फोटो अपलोड करावा. त्यानंतर  परीक्षक आपल्या बैलजोड्या पाहण्यासाठी आपल्याकडे येतील .उत्कृष्ट 21 बैलजोड्यांना आकर्षक बक्षिसे तसेच सहभागी सर्व बैल मालकांचे सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहेत. व  उर्वरित सर्व गावांतील  प्रत्येकी एका बैलजोडीला उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. तरी सर्वांनी ,  बळीराजांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी केले.

Post a Comment

 
Top