0
सासवड ( प्रतिनिधी)  - काल रात्रीपासून  झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहर व जिल्हाभर हाहाकार घातला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड मध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामूळे सासवड शहरात ही पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, काहींच्या घरात पाणी शिरले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी करुन राज्यमंत्री विजय  शिवतारे यांनी नागरिकांना आधार दिला असून त्यांची सोय केली आहे. तसेच  संबधित अधिकारी वर्गाशी बोलून तात्काळ मदतकार्य पोहचविण्यासाठी मदत केली. यावेळी  घाबरुन जाऊ नका, मेसेज फॅारवर्ड करताना खोट्या व अफवा पसरविणा-या गोष्टींचा विचार करा. खोटे मेसेज व्हायरल करु नका असे आवाहन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले .Post a Comment

 
Top