0
सासवड ( प्रतिनिधी ) -  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या साबळे फार्मसी महाविद्यालय सासवड येथे शेठ गोविंद रघुनाथ सा

बळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त औषधनिर्माणशास्र  पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी औषधनिर्माणशास्र या विषयातील परदेशातील संधी यावर मा.श्री मिहीर देसाई - व्यव्थापक त्रिवेदी ग्लोबल एडुकेशन,  मुंबई व मा. सौ.मुग्धा मोहोळ - त्रिवेदी ग्लोबल एडुकेशन, मुंबई यांनी मार्गदर्शन केले. कै.गोविंदशेठ साबळे साबळे यांनी ग्रामीण भागातील विद्याथ्यांना औषधनिर्माणशास्रचे  शिक्षण उपलब्ध करून देण्यास त्यांचा मोलाचा वाट आहे. विदयार्थी हा उद्याचा नागरिक आहे. हे विद्यार्थी ज्या ठिकाणी घडतात तेथे विदयार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील संवाद हि काळाची गरज आहे. तसेच पदविका विभागाच्या  विध्यार्थ्यांना  मा.श्री.व्ही.न.राजे - प्राचार्य  गौरी शंकर फार्मसी कॉलेज, सातारा यांनी संशोधनात्मक विचार आणि उद्योजगता यावर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांनी कै.गोविदशेठ  साबळे यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृटीने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या गेलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या  कार्यक्रमासाठी जेजुरी देवस्थानचे व्यवस्थापक सदस्य आणि  प्रख्यात उद्योजक मा.श्री.राजीवशेठ खुडे  आणि सासवडचे प्रख्यात उद्योजक  मा.श्री.प्रकाशदादा शेडगे यांची विशेष उपस्थिती लाभली.  सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा.वैभव शिळीमकर व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.अमोल काळे यांनी केले व प्रास्ताविक प्रा.सौ. जयश्री जगताप आणि आभार प्रदर्शन डॉ.सौ.राजश्री चव्हाण आणि प्रा.मंजुश्री पानसरे यांनी केले.

Post a Comment

 
Top