0
सासवड ( प्रतिनिधी )  - सासवड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात काल रात्रभर पाऊस पडला असून  त्यामुळे कर्हा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने  सासवड वरून नारायणपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहिले त्यामुळे पुलावरील रस्ता खुप खराब झाला, पाणी ओसरल्यानंतर त्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी संबंधित विभागाशी पोलिसांनी संपर्क केला व रस्ता दुरुस्तीची मागणी केली परंतु संबंधित विभागाने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही त्यामुळे अखेर सर्व पोलिस कर्मचारी यांनी मिळून रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती डागडुजी केली आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला, प्रवाशांचे होणारे हाल व पूर परिस्थिती तसेच पावसाळी हवामान यामुळे काही प्रमाणात पोलिसांनी केलेल्या श्रमदाना मुळे प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे , पोलिसांनी खड्डे बुजवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

Post a Comment

 
Top