0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून  वारके यांनी आज जेजुरी पोलीस स्टेशनला भेट देत कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना हे देखील उपस्थित होते.
  कोल्हापूर परिक्षेत्राचे आय. जि. वारके पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. वारके  यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा कार्यभार हाती घेतला होता , आज जेजुरीत भेट देऊन त्यांनी  जेजुरी पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी घेतली,  सदर तपासणी दरम्यान पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत व पोलीस स्टेशन परिसराची पाहणी केली, तसेच जेजुरी पोलीस स्टेशन कडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामाचा आढावा घेऊन चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करून बक्षीस घोषीत केले, एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी कौतुक करून बक्षीस दिल्याने अधिकारी व कर्मचारी यांचा उत्साह यावेळी वाढला.तसेच त्यांनी पोलीस कर्मचारी यांचा दरबार घेऊन त्यांना असणाऱ्या अडीअडचणी एकूण घेतल्या तसेच त्यांना कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी बाबत विचारणा केली. पोलीसांनी शारिरीक व मानसीक दृष्ठ्या सक्षम राहण्यासाठी नियमीत योगा व व्यायाम करणे बाबत सूचना दिल्या तसेच आपल्या कामा प्रति निष्ठा ठेवण्यास सांगितले. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी निरीक्षणदरम्यान सहकार्य केले.

Post a Comment

 
Top