0
पुणे ( प्रतिनिधी ) - पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ वाघापूर संचलित पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय वाघापूर येथिल शिक्षक प्रशांत राजाराम बेंगळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रशंसनिय कार्या बद्दल महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने शुक्रवार दि.२२/११/२०१९ रोजी भोसरी येथे आयोजित समारंभात विधान परीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते "जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षक " पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
   भोसरी येथे कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह या सभागृहात महाराष्ट्र शाळा कृती समिती पुणे यांच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 पुरंदर तालुक्यातील उपक्रमशील शाळा हा पुरस्कार पुरंदर हायस्कूल अँन्ड ज्युनिअर काॕलेज सासवड यांना मिळाला,शिवशंभो विद्यालय एखतपूरचे मुख्याध्यापक भगवंत बेंद्रे यांना कृतीशील मुख्याध्यापक ,जिजामाता हायस्कूल अँन्ड जुनिअर काॕलेजच्या वर्षा देसाई यांना कृतीशील शिक्षिका , कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय परींचेच्या संजय धुमाळ यांना कृतीशील शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
   याप्रसंगी महाराष्ट्र कृती समिती पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण बर्डे,सचिव अनंतराव गर्जे,महेंन्द्र गणपुले,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नंदकुमार सागर,माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत ताकवले,पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर जगदाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ वाघापूरचे अध्यक्ष सतीशशेठ उरसळ,कार्याध्यक्ष अजितदादा निगडे,सचिव उत्तम निगडे,उपाध्यक्ष बापूसहेब कुंजीर,संचालक शिवाजी इंदलकर,दत्तात्रय गायकवाड ,संगिता कुंजीर ,मुख्याध्यापक दिलीप मोरे आदिंनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

 
Top