0
सासवड ( प्रतिनिधी ) :-महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१९ साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शनिवारी ( दि ७ डिसेंबर ) सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी व्यायाम मंदिर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी दिली.
           निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवड येथे बैठक झाली. याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक पै भगवान म्हेत्रे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य पै राजेंद्र जगताप, तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै विनोद जगताप, सदस्य पै बाळासो कोलते, पै गुलाबराव गायकवाड, पै गणेश खेनट, व्यायाम मंदिराचे व्यवस्थापक पै माउली खोपडे आदी उपस्थित होते. बाल, कुमार आणि वरिष्ठ गटात या निवड स्पर्धा होणार आहेत. दि ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत स्पर्धकांची वजने घेतली जाणार असून आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दुपारी १२ वा स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. दु १२ पासून रात्री ९ पर्यंत या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. बाल आणि कुमार गटातील स्पर्धा गादी विभागात तर वरिष्ठ गटातील स्पर्धा गादी आणि माती विभागात वजन गटनिहाय होणार आहेत.

स्पर्धेसाठी वजनगट पुढीलप्रमाणे :-

बाल गट :- २२ ते २५ किलो, २८ किलो, ३२ किलो, ३५ किलो, ३८ किलो आणि ४२ किलो.

कुमार गट :- ४१ ते ४५ किलो, ४८ किलो, ५१ किलो, ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७१ किलो, ८० किलो, ९२ किलो, आणि ११० किलो पर्यंत.

वरिष्ठ गट :-  गादी व माती विभाग :- ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो. आणि ८६ ते १२५ किलो खुला गट.   

Post a Comment

 
Top