0
सासवड ( प्रतिनिधी ) -  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि संविधानाची प्रतिमा या पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  म्हणून  अॅड. मा.श्री.संतोष मोटे - एक्झिक्युटिव्ह मेंबर पुणे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांची उपस्थिती लाभली. यांनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय, त्यात येणारे घटक, कलम, माहिती अधिकार याबाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांनी विध्यार्थ्यांना संविधान कसे तयार झाले आणि संविधानाचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमात सहभागी सर्वांनी सविंधनाची प्रतिज्ञा घेतली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापिका मंजुश्री पानसरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्याथीनी कु.शुभांगी कामठे व कु. अपर्णा बिरामाने यांनी केले. आणि  आभार प्रदर्शन कु.उल्हास नाले यांनी केले.Post a Comment

 
Top