0
सासवड ( प्रतिनिधी ) - पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती पुरंदर यांच्यावतीने तालुकास्तरीय नाट्यस्पर्धा न्यू इंग्लिश स्कुल गुर्‍होळी या ठिकाणी घेण्यात आल्या.
या नाट्य स्पर्धेत विद्या महामंडळ प्रशाला कोथळेच्या वतीने मराठी विभागात किरण सरोदे लिखित व अशोक साबळे दिग्दर्शित अहो ! आमचं जरा ऐकता का ? या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नाटीकेला द्वितिय क्रमांक मिळाला. तसेच उत्कृष्ठ दिग्दर्शनासाठी अशोक साबळे सर व उत्कृष्ठ अभिनयासाठी कु.तनिष्का भोसले यांना गौरविण्यात आले.विद्या महामंडळ प्रशाला कोथळे या विद्यालयाची तालुकास्तरीय नाट्यस्पर्धेत हॅट्रीक मिळवली असून, सलग तिसर्‍यांदा द्वितिय क्रमांक मिळवला आहे. २०१७- देवाला झाला डेंग्यू (सामाजिक कचरा प्रदुषण  विषयावर आधारीत), २०१८- पृथ्वी को आया बुखार (पर्यावरणावर आधारीत) २०१९- अहो!आमचं जरा ऐकता का ? (पालक व विद्यार्थी संबंधावर आधारीत) तसेच तीनही वर्षी उत्कृष्ठ दिग्दर्शक म्हणून कलाशिक्षक अशोक साबळे यांचा तर तीनही वर्षी उत्कृष्ठ कलावंत म्हणून तनिष्का भोसले हीच गौरव करण्यात आला आहे. संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक मा.दरेकर सर यांनी  नाट्य स्पर्धेतील सहभागी विद्यार्थिनी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

 
Top