0

जेजुरी ( प्रतिनिधी ) - यथा देहे तथा देवे  या  संत उक्ती प्रमाणे मनुष्यप्राणी देवाची सेवा करत असतो अशा परंपरा शेकडो वर्षांपासून आजतागायत जतन केल्याचे चित्र मंदिरांमधून आपणास पाहवयास मिळतात. ऋतूप्रमाणे चालणाऱ्या या जीवन शैलीत अनेक निस्सीम भक्त आपल्या देवाची काळजी घेत असतात हा नित्य नियम म्हणजे भूपाळी आरती धुपारती आणि शेजआरती या ऋतूप्रमाणे चालणारे धार्मिक विधी आजही अगदी  पहाटेपासून ते रात्री पर्यंत चालणाऱ्या भक्तीकल्लोळाची ओळख आपल्या देवभूमी असलेल्या अवघ्या महाराष्ट्राला आहे. सर्वसामन्य बहुजनांची देवता असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला हि येथील धार्मिक अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या मेघमल्हार प्रतिष्ठान आणि पुजारी सेवाधारी वर्गाने आपल्या या श्रद्धापोटी सद्याच्या कडाक्याच्या थंडीत देवालाही भक्तीची उब मिळावी म्हणून कुलदैवत खंडोबा देवाच्या साक्षात मार्तंड भैरव या मूर्तीस शेजआरती वेळी मफलर आणि उबदार रग प्रधान केला या थंडीत ऋतूप्रमाणे देवाला स्नानासाठी सुगंधीत गरम पाणीच उपयोगात आणले जाते या बाबतची माहिती मेघमल्हार प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन उपाध्ये गुरुजी यांनी दिली. मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने देव सेवेनंतर उघड्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या जेजुरगड पायरी मार्गावरील अनाथ निराधार भिक्षेकरींना उबदार रग वाटप केले त्यासोबतच यावर्षी पुरंदर किल्ल्याच्या माहूर खोऱ्यातील उसतोड शेतमजुरांना कडाक्याच्या थंडीत उघड्यावर राहणाऱ्या अनेक कुटूंबांना उबदार रग वाटप केले. या कार्यक्रमाचे आयोजन  मेघमल्हार प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन उपाध्ये गुरुजी, राहुल मंगवाणी, सुर्यकांत नेवसे, मोहन कदम सर, सुरेंद्र दुधम, शहाजी सकट, आशा संस्थेचे सदस्य नितीन जगताप समन्वयक अझर नदाफ यांनी केले. काही असो भोळ्या भाबड्या भक्ती श्र्देच्या विश्वासातून देव सेवा हि ईश्वर सेवा मानून गरजू लोकांची केलेली सेवा हाच खरा माणुसकीचा देवधर्म म्हणावा लागेल

Post a Comment

 
Top