0
सासवड ( प्रतिनिधी ) - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात  दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असताना उपलब्ध असणाऱ्या विविध घटकांचा पुरेपूर फायदा करून स्वतःची प्रगती करावी. देशाचा तरुण घटक हीच देशाची खरी संपत्ती आहे. तसेच औषधनिर्माण शाखेत शिकणारे विद्यार्थी हे समाजाला आरोग्य सेवा देणारे महत्वाचे घटक आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करावे असे मार्गदर्शन मा. संजयजी जगताप आमदार पुरंदर  विधानसभा मतदार संघ यांनी केले. या  कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी  मा.श्री.अशोक टेकवडे - माजी आमदार पुरंदर विधानसभा मतदार संघ,  मा.श्री.संजयजी जगताप - आमदार पुरंदर विधानसभा मतदार संघ, मा.श्री.जयवंत वाडकर - सिने अभिनेते, मा.श्री.मोहनराव देशमुख - खजिनदार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे,  मा.श्री.बंडूकाका जगताप - उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ,  मा.श्री.संतोष जगताप - अध्यक्ष स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्टान, सासवड, मा.श्री. बाळासाहेब भिंताडे- उपाध्यक्ष मेडिकल असोसिएशन पुणे जिल्हा, श्रीमती. कलाताई फडतरे- माजी नगराध्यक्ष सासवड शहर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपथित होते. सिनेअभिनेते जयवंत वाडकर यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधला, तसेच त्यांनी  महाविद्यालयात येताना सकारात्मक ऊर्जा जाणवली असे त्यांनी कार्यक्रमावेळी सांगितलं.  विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक  दिनामध्ये  भारत देशातील विविध सण सादर केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या जयंती निम्मित मा.दीपा परब पहिली महिला बाउन्सर यांची टीम उपस्थित होती. कार्निवल फेस्टिवल या मध्ये विध्यार्थ्यानी फूड आणि गेम याचे स्टॉल लावून आलेल्या पाहुण्याची मने जिकून घेतली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. तसेच या प्रसंगी  या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. वाय. पाटील यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर भिसे व प्रा.हर्षा शेंडकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.दीपाली जगताप यांनी केले.

Post a Comment

 
Top