0
सासवड, ता. १ ः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय अकरावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड (ता.पुरंदर) येथे १२ मार्च रोजी होणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक व साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांनी दिली.

 क-हाकाठावर होणा-या या साहित्य संमेलनाची सुरवात सकाळी ९.३० वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावरुन साहित्य ज्योत संमेलनस्थळापर्यंत आणण्यात येणार आहे. उद्घाटनसमारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, परिसंवाद, एकपात्री नाट्य प्रयोग व कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणा-या इच्छुक कवी, लेखकांनी  ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री यादव यांनी केले.

संमेलनाच्या संयोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, तालुकाध्यक्ष शामकुमार मेमाणे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता भोंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील लोणकर, तालुका उपाध्यक्ष नंदू दिवसे, संघटक दत्तात्रय कड, सुनीलतात्या धिवार, गंगाराम जाधव, शैलेश रोमण आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top