0
गराडे दि.३१ (वार्ताहर )  संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.संपूर्ण देशात व  महाराष्ट्रात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.
हा रक्त तुडवडा भरुन काढून देशसेवेसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांनी केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत  सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा पञकार संघ, पुरंदर तालुका मराठी  पत्रकार संघ ,भिवरी ग्रामपंचायत व नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट यांच्या वतीने अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने जि. प. प्राथमिक शाळा भिवरी, ता. पुरंदर येथे मंगळवार दि.३१ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर  आयोजित केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  डी. एस. हाके यांच्या हस्ते झाले.त्यांनी स्वतःदेखील रक्तदान केले. पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी रक्तदान शिबीरास भेट देवून रक्तदान शिबीर आयोजकांचे व रक्तदात्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.या रक्तदान शिबीरात तब्बल १०२ जणांनी  रक्तदान केले.
         यावेळी पुरंदर पंचायत समिती मा. उपसभापती दत्ताशेठ काळे, गणेश अपंग संघ अध्यक्ष गुलाब घिसरे,विशाल नागरी पतसंस्थेचे संचालक सखाराम कटके ,प्रहार अपंग संघ महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे, भिवरी सरपंच वैशाली ढवळे,उपसरपंच सीमा कटके ,बोपगाव उपसरपंच राम फडतरे , ग्रा.प.सदस्य शंकर घाटे,ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे,तलाठी गणपत खोत ,तंटामुक्ती अध्यक्ष मारुती कटके ,माजी अध्यक्ष दिलीप कटके ,गोसावीबुवा तरुण मंडळाचे अध्यक्ष हनुमंत कामठे ,वीर नेताजी मंडळाचे अध्यक्ष संभाजी नाटकर,भैरवनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबाजी घिसरे,उद्योजक संजय कटके,निलेश येवले,नवनाथ कटके , विकास सोसायटी चेअरमन पोपट कटके ,व्हाईस चेअरमन भाऊसाहेब दळवी,माजी सरपंच दत्ताञय घाटे, शहाजी लोणकर ,सुवर्णा कटके , तुकाराम कटके ,तानाजी कटके शिवाजी पवार,दत्ताञय ताम्हाणे,संदिप घाटे,शेखर पिसे,दिपक घाटे,विजय घाटे,शिक्षकनेते वसंत कामथे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कटके ,हनुमंत साळुंके,शेखर कटके ,ईश्वर कटके ,रामहरी कटके ,अजित कटके आदीसह भिवरी ,बोपगावकर ग्रामस्थ उपस्थित होते.
    रक्तदान शिबीराचे आयोजन  पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर ,पुरंदर तालुका पञकार संघाचे अध्यक्ष दत्ता भोंगळे,जिल्हा प्रतिनिधी बी.एम.काळे,उपाध्यक्ष अमोल बनकर,मार्गदर्शक प्रदिप जगताप ,सुनीता कसबे,सुनील धिवार,संतोष डुबल आदीसह जिल्हा व तालुका पञकार संघाच्या कार्यकारीणी व सदस्य,भिवरी सरपंच वैशाली ढवळे,उपसरपंच सीमा कटके , नवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माऊली फडतरे , विश्वस्त दिपक फडतरे व विश्वस्त मंडळ यांनी यशस्वीपणे केले.
       या रक्तदान शिबीरास  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या साथीमुळे जणू
करुणेचीही साथ आली. पञकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भिवरी,बोपगाव पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी ही टंचाई दूर करून समाजकार्याचा आदर्श घालून दिला. काही रक्तदात्यांना नाईलाजाने नाही म्हणावे लागले असा अनुभव प्रथमच येत असल्याचे अक्षय रक्तपेढीचे संचालक डॉ.संजय शिंदे यांनी सांगितले.
       अक्षय ब्लड बँकेचे सागर लोहकरे,प्रशांत शिगवण,सुमित पल्लमवार,रुपेश दुरकर,शंकर शिंदे,तेजस तांदळे,नंदकुमार गाडेकर,विशाल लोहकरे,अंजली अहुजे यांनी सहकार्य केले.
        कोरोनामुळे ' साथसोवळे ' पाळत हे शिबीर पार पडले. प्रत्येक रक्तदात्याला वेळ आधीच ठरवून दिली होती.  रक्तदात्यांना  येण्याजाण्यासाठी पोलिसांनी सर्व ते सहकार्य केले. वेळेनुसारच रक्त घेतले जात होते. बसण्यासाठी मुद्दाम खुर्च्या लांब लांब ठेवून व्यवस्था करण्यात आली होती. उत्तम नियोजनामुळे हे सगळेच चक्र व्यवस्थितरीत्या पार पडले. असाधारण परिस्थितीत शिबीर नियोजनाचा एक आदर्श घालून दिला गेला.
     प्रास्तविक संजय कटके यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन माऊली घारे यांनी केले.आभार सुनील गोफणे यांनी मानले.

Post a Comment

 
Top