0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने सर्व खाजगी अस्थापने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे अनेकांचे रोजगार  रोजगार बुडणार आहेत. अनेकांची घरे व दुकाने बंद रहाणार आहेत.याचा गैरफायदा घेत  चोरीच्या घटनांवाढु शकतात.आणि म्हणूनच पुरंदर मधिल जेजुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने यांनी पोलिस पाटलांना सतर्क रहाण्याच्या सुचना दिल्या आलेत.
    जेजुरी पोलिस स्टेशन मध्ये कोरोनाचा आटकाव व त्या अनुसंघाने उद्भवनारी कायदा सुव्यवस्था..... याबाबत पोलिस पाटील व पोलिस यांच्यात बैठक घेउन चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष  विजय कुंजीर,पुरंदर पो.पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन इंगळे पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांसह  जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व पोलिस पाटील,महीला दक्षता कमिटीच्या सदस्या ई. उपस्थित होते. यावेळी माने म्हणाले की,  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होउ नये म्हणुन पोलिस पाटलांनी लोकांना  सतर्क करावे.शहरातून आलेल्या लोकांबद्दल माहीती घ्यावी.त्यातील कोणी परदेश प्रवासातुन आले आसल्यास प्रशासनाला त्याची माहिती द्या.त्याच बरोबर गावात चोरीच्या घटना घडूनयेत म्हणून  पोलिस पाटीलांनी सतर्क राहण्याच्या  सुचना देण्यात आल्या आहेत..तसेच पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावातुन महिला विषयक अपराधामध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे पोलिस पाटलांनी महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून गावातील महीला विषयक अपराध होणार नाहीत याबाबात काळजी घ्यावी.
गावातील लोकांनी अशा प्रकारी पोलिस पाटलांना सहकार्य करावे असे अवाहन पोलिस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top