0
सासवड ( प्रतिनिधी )  - पुरंदर हवेलीत गोरगरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना अन्नधान्य पुरवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून शिवसैनिकांनी या कार्यात स्वतःला झोकून देण्याच्या सूचना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलेल्या आहेत.
       शिवतारे म्हणाले, हातावर पोट असलेले लोक मोठ्या संकटात आहेत. गावागावातले मोलमजुर, कामगार आणि परप्रांतीय यांना लॉकडाऊनच्या काळात जगणं हे एक आव्हान होऊन बसलं आहे. त्यामुळे या लोकांपर्यंत अन्नधान्य कसं पोचवता येईल याबाबत शासन यंत्रणेनं काही नियोजन करणं आवश्यक आहे. आम्ही आमच्या परीनं लोकांना मदती पोचवू. अशी सामाजिक जबाबदारी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना लॉक डाऊनच्या काळात त्रास होणार नाही याबाबत पोलीस यंत्रणेला सूचना द्याव्यात असं आवाहन माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज प्रशासनाला केलं आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याशी त्यांनी अन्नधान्य आणि प्रशासनिक मदत याबाबत चर्चा केली. फुरसुंगी येथे शंकरराव हरपळे, कैलास ढोरे, महेश हरपळे, ज्ञानेश्वर कामठे, युवासेनेचे शादाब मुलाणी, बाजीराव सायकर, वडकी येथे संदीप मोडक, तर उरुळी परिसरात राजीव भाडळे, संतोष भाडळे अशी फळी लोकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. सासवड व परिसरात शहरप्रमुख अभिजित जगताप, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, डॉ. राजेश दळवी, युवासेनेचे मंदार गिरमे, आंबेगाव परिसरात दादा कोंढरे, सचिन दांगट आणि इतर कार्यकर्ते हे काम करत आहेत. उंड्री येथे स्वाती टकले तर पिसोळी येथे मच्छिन्द्र दगडे,सचिन निंबाळकर यांच्यामार्फत अशा गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातील असे शिवतारे यांनी सांगितले आहे

Post a Comment

 
Top