1
पुरंदर ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुक्यातील तोंडल येथे आलेला पाहुणा दोन दिवसाच्या पाहुणचारा नंतर कोरोना पाॅजिटीव्ह निघाला असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी  दिली आहे, असे असले तरी प्रत्यक्ष पुरंदर मधिल कोणीही व्यक्ती कोरोणा पाॅजिटीव्ह नसल्याचे म्हणत लोकांनी घाबरून न जाण्याचे अवाहन त्यांनी लोकांना केले आहे.
           याबाबात  मिळालेल्या माहितीनुसार हडपसर येथे रहाणारा एक तरूण दि.२७.४.२०२० रोजी तोंडल येथे सास-यांसाठी औषधे घेउन आला होता.त्याने तोंडल येथे दोन दिवस मुक्काम केला.हडपसर येथील त्याचे मित्र कोरोना पाॅजिटीव्ह निघाल्याने प्रशासनाने त्याचा शोध घेवुन तपासणी केली असता तो कोविड 19 पाॅजिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 22 व्यक्तीं आरोग्य विभागाने identify केलेल्या आहेत. त्या पैकी कोणालाही आजपर्यंत काहीही कोरोनाचे लक्षण नाहीत. परंतु प्रोटोकॉल नुसार प्रशासनाने त्या सर्वांना सासवड येथील  कोविड केअर सेंटरमध्ये  मध्ये ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. तेथून त्यांचे स्त्राव तापसनिकरिता पुणे येथे  शनिवारी किंवा रविवारी पाठविणेत येतील असे तहसीलदारांनी सांगितले आहे. चुकून जर तपासनीत पोझिटीव्ह कोणी आढळुन आले तर या व्यक्तीला पुण्याला पाठवले जाईल अन्यथा त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल , प्रत्यक्षात पुरंदर  तालुक्यात आजपर्यंत कोणीही कोरोना पाॅजिटीव्ह  रुग्ण नाही.  लोकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन  पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सनोबत यांनी केले आहे.
    पुरंदर तालुका हा पुण्याला लागुन असलेला तालुका आहे मात्र अजुन पर्यंत कोरोशाचा प्रवेश या तालुक्यात झाला नव्हता.मात्र बाहेरून आलेल्या एका व्यक्तीमुळे आता पुरंदर मध्ये सुध्दा कोरोना रूग्ण मिळाल्याची शक्याता निर्माण झाली आहे.

Post a Comment

  1. Lockdown astana ha vakyati gela ksa tikde 6 te 7 police check post olandun

    ReplyDelete

 
Top