0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिका ,महसूल ,पोलीस ,आरोग्य प्रशासनाबरोबर समन्वय ठेवत  जेजुरीतील मार्तंड देवसंस्थानच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत .मात्र देवसंस्थानच्या तिजोरीवर या उपाययोजनांमुळे मोठा ताण पडलेला असून मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील देणगीदार ,दानशूर भाविकांनी पुढे यावे असे आवाहन देवसंस्थानच्या वतीने करण्यात येत आहे .
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिर ,गडकोट आवाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्रीमार्तंड देवसंस्थान समितीकडून सध्यस्थीतीतील आपत्कालीन  वेळेत गोरगरिबांना अन्नसेवा ,औषध फवारणी ,कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना प्रशासनाच्या सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक लावलेली वाहने खेडोपाडी पाठवणे ,आवश्यक तेथे रुग्णवाहिका ,पोलीस प्रशासनाला बंदोबस्तासाठी देवसंस्थान कर्मचाऱ्यांची मदत ,जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल प्रशासनाच्या मागणी नुसार जीवणावश्यक वस्तूंचे किट पुरवणे आदी उपक्रम २४मार्च पासून सुरू आहेत .जेजुरी शहर ,व औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय कामगार ,बेरोजगार ,निराधार व गोरगरीब कुटुंब अशा सुमारे २५०० नागरिकांना दोन वेळेस अन्नसेवा पुरविण्यात येत आहे ,यासाठी दररोज ४५०किलो तांदूळ लागत असून अन्नसेवा देण्यासाठी देवसंस्थानचे ४०कर्मचारी राबत आहेत.
जेजुरी शहर व पंचक्रोशीतील गाव वाडी ,वस्ती आदी खेडोपाड्यात औषध फवारणी साठी दीड महिना पुरेल एवढा जंतूनाशक औषध साठा ठेवण्यात आला आहे .
गरजू नागरिक आपत्कालीन सेवेत असणारे कर्मचारी ,पोलीस ,वैदयकीय व्यवसाय करणारे डॉक्टर ,ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना एन.९५ मास्क ,पीपीई किट ,व सेनेटायझर आदींचे वाटप करण्यात आले आहे.शिरूर ,भोर ,पुरंदर ,हवेली ,जेजुरी ,येथील गरजू ,व गरीब सुमारे १हजार  कुटुंबाला  किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात येत आहे .
भविष्यकाळातील कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता खबरदारीचा उपाय म्हणून ससून रुग्णालयात स्वातंत्र्य आयसोल्युशन वार्ड निर्मितीसाठी  ५१ लक्ष रुपयांची मदत करण्यात आली आहे.सध्या दिवसेंदिवस अन्नसेवेतील लाभार्थी व गरजूंची संख्या वाढत आहे.त्याचा मोठा ताण देवसंस्थान तिजोरीवर पडत आहे.सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आली असली तरी ,पुढील काळात लॉकडाऊन वाढले तर देवसंस्थानकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा कालावधी वाढविण्यात येणार असून कोणीही नागरिक उपाशी राहता कामा नये ,सध्या नागरिकांच्या आरोग्य आणि पोटाचे युद्ध आहे ,ते जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवण्याचे धोरण देवसंस्थानचे आहे .देवाच्या तिजोरीत येणारा पैसे हे सर्व सामान्य जनतेच्या देणंगीदानातुन आलेला आहे ,तो मानवसेवेसाठी वापरण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठरले. सध्याच्या आपत्कालीन वेळेत मदतीसाठी पुढे येणाऱ्या देणंगीदारांनी देवसंस्थानच्या बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्र.60167800884,{ I F S C कोड MAHB 0001828  } या क्रमांकावर आपले धनादेश जमा करावेत ,ज्या व्यक्तींना धान्य स्वरूपात मदत करावयाची आहे ,आशा व्यक्तींनी फोन न.9689020000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विश्वस्त तुषार सहाणे यांच्याकडून अन्नसेवेसाठी  दिली देणगी ,,,,,,::::::::::::::::::::::::::::::::
शनिवारी(दि.११) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देवसंस्थान विश्वस्त तुषार सहाणे यांनी १लक्ष ११हजार रुपयांची मदत अन्नसेवेसाठी करण्यात आली आहे.तसेच सुमारे१हजार गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले .गेल्या आठवड्यात श्रीक्षेत्र नारायणपूर संस्थान कडून दोन हजार किलो तांदूळ जेजुरी देवसंस्थानला उपलब्ध झाला आहे ,अशाच प्रकारे राज्यातील देणगी दारांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top