0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेजुरीतील मार्तंड देवसंस्थान कडून प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत असून औद्योगिक वसाहती मधील सुमारे १५०० ,बेरोजगार कुशल ,अकुशल  परप्रांतीय कामगारांसाठी युनिट नंबर दोन मधून दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था गेली १५दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे .याचा मोठा ताण देवसंस्थानवर पडत होता ,मात्र आता येथील कारखानदारांनी स्थापन केलेली "जिमा "संघटना सरसावली असून जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे ,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे ,उद्योजक रवींद्र जोशी ,राजेश पाटील ,खरेदी विक्री संघाचे संचालक धनंजय भोईटे ,आदींनी २ हजार किलो तांदूळ ,४००किलो तूरडाळ ,आणि सुमारे १लक्ष २५हजारांचा धनादेश मार्तंड देवसंस्थान समितीकडे सोपविण्यात आला यावेळी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप,विश्वस्त शिवराज झगडे ,पंकज निकुडे ,मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ,सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने आदी उपस्थित होते .
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे १५००पर्यंत मराठी आणि परप्रांतीय असून त्यांना गेली १५ दिवसांपासून देवसंस्थानच्या वतीने दोन वेळा अन्नसेवा देण्यात येत आहे ,या वाटपासाठी "जिसा" संघटनेचे पदाधिकारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत ,जिसा संघटनेचे सचिव विनायक कुडाळकर ,विक्रम फाळके व कार्यकर्त्यांच्या वतीने  अन्न वितरणासाठी नियोजन करण्यात येत आहे.यापूर्वी त्यांनीही कामगारांसाठी भरीव निधी दिला आहे. किमान ३मे पर्यंत ही सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

 
Top