0
सासवड ( प्रतिनिधी ) - जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानकडून तालुक्यातील ५० पत्रकारांना जीवनावश्यक किराणा वस्तूंच्या  किटचे वाटप कार्नाय्त आले , मार्तंड देवसंस्थनला यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत की, पत्रकारांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला.तब्बल ५० किट्स गरजू पञकारांना देण्यात आले.त्यांचा हा उपक्रम अभिनंदणीय व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पुरंदरच्या तहसिलदार रुपाली सरनोबत यांनी केले.
     सर्वच पत्रकार सुखवस्तू आहेत. त्यांना काही अडचणी नाहीत असा एक चुकीचा समज समाजात पसरलेला आहे. मात्र वास्तव काय आहे याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला आहे.कोरोना विषाणूच्या प्रकोपाने अनेकांना अडचणीत आणले आहे
सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय एस.एम.देशमुख सर यांनी गरजू पञकारांना मदत करण्याचे आवाहन मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे व पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर  यांना केले होते.
         त्यानुसार पञकार व विश्वस्त शिवराज झगडे यांनी पुणे जिल्हा पञकार संघ व पुरंदर तालुका पञकार संघाला किट देण्यासाठी जेव्हा नावं मागितली तेव्हा तब्बल ५० पत्रकारांनी आपली नावे नोंदविली.पुणे जिल्हा पञकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी  पत्रकार संघाच्या गरजू ५० सदस्यांना जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थान यांच्या वतीने व पञकार व  विश्वस्त मा.शिवराज झगडे साहेब यांच्या प्रयत्नातून व प्रमुख विश्वस्त मा. संदीप जगताप ,विश्वस्त मा.राजकुमार लोढा ,मा.अशोकराव संकपाळ ,मा.पंकज निकुडे ,मा.प्रसाद शिंदे ,मा.तुषार सहाणे  यांच्या सहकार्यातून  ५० किराणा किटचे वितरण बुधवार दि.१५ एप्रिल रोजी  सासवड येथील पुरंदर तहसिल कार्यालयात तहसिलदार .रुपाली सरनोबत ,विश्वस्त शिवराज झगडे,पुरंदर तालुका पञकार संघाचे अध्यक्ष दत्तानाना भोंगळे ,पुणे जिल्हा पञकार हल्ला विरोधी समिती अध्यक्ष बी.एम.काळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी पुरंदर तालुका पञकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. किराणा किट वितरण नियोजनाची व्यवस्था काटेकोरपणे मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त व पञकार शिवराज झगडे यांनी केली.त्याबद्दल पुणे जिल्हा पञकार संघ व पुरंदर तालुका पञकार संघाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
        प्रास्तविक पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले.सुञसंचालन सुनीता कसबे यांनी केले.आभार पुरंदर तालुका पञकार संघाचे उपाध्यक्ष अमोल बनकर यांनी मानले.

Post a Comment

 
Top