0
पुरंदर ( प्रतिनिधी ) -  पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील लेबर कॅम्पमध्ये राहणा-या एका वृद्धाचा
 आज सकाळी मृत्यू झाला असूनसकाळी त्याला उलटीचा त्रास झाल्यानंतर त्याला रूग्णालयात नेले असता त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
    जेजुरी ता.पुरंदर येथे फिरीस्ते कामगारांसाठी पुण्यशलोकअहिल्यादेवी विद्यामंदिर आणि एसी हुंडेकरी शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या कॅम्पमध्ये ६९ कामगार वास्तव्यास आहे.या मध्ये बाळू पवार नावाचा ६८ वर्षीय ईसम रा.खराबवाडी,ता.खेड,जि.पुणे.हा  दि.१२.४.२०२० रोजी राहण्यास आला होता. आज सकाळी त्याला रक्ताची उलटी झाल्याने तेथील लोकांनी नोडल अधिकारी बाळासाहेब बागडे यांना याबाबत माहिती दिली.यानंतर  पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.पवार यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबतची खबर बाळासाहेब बागडे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे.अधिकचा तपास जेजुरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

 
Top