0
पुरंदर ( प्रतिनिधी ) -  पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माहुर येथे सशाची शिकार केल्या प्रकरणी वन विभागाने चार जणांवर कारवाई केली आहे.त्यांच्यावर वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे शिकारीला गेलेल्यांवर शिकार होण्याची वेळ आली आहे.
      दि.30 रोजी वनविभागाला  माहुर आणि परिसरात शिकार होत असल्याची  गुप्त माहिती मिळाली या माहीतीवरून  वनविभागाने सापळा रचला आणि सशाची शिकार करणारे चार जण वनविभागाच्या हाती लागले. त्यांच्यावर वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये  बाळू सदाशीव मोहीते (वय ५७) संपत कांतीलाल खोमणे (वय ४६) विठ्ठल गोविंद खोमणे (वय,५४) अण्णा बबन जाधव (वय ६२) सर्वजन राहणार माहूर ता.पुरंदर जि.पुणे. यांचेवर ही करवाई करण्यात आली आहे. याच्यावर कारवाई करण्यासाठी झालेल्या ऑपरेशन मध्ये वनक्षेत्र अधिकारी श्रीमती जगताप, वनपाल व्हि.एस.बागल, वाय.जे.पाचरणे, वनरक्षक वाय.बी.टीकोळे, व्ही.बी.तांबे,वनसेवक रमेश गाडे, दत्तात्रय शिर्के, नवनाथा भंडलकर, यांच्या पथकाने सहभाग घेतला .या आरोपींना आज सासवड न्यायालया समोर हजर केले असता त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहा महीने ते तिन वर्ष पर्यंत शिक्षा होवू शकते असे वन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


जयश्री जगताप (वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड)

लाॅकडाऊनच्या काळात प्रशासन बंदोबस्ताच्या कामासाठी गुंतले असताना त्याचा गैरफायदा घेत कोणीही वन्याप्रण्यांची शिकार करू नये .अन्यथा त्यांचेवर भारतीय वन अधिनीयम १९२७ व वन्यजिव संरक्षण कायदा १९७२ नुसार कडक कारवाई करण्यात
येईल

Post a Comment

 
Top