0
पुरंदर ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुरंदर तालुक्यातील चेकपोष्टवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्या पोलिस,माजी सैनिक,शिक्षक,पोलिस पाटील व गृहरक्षक दलाच्या जवानांना गुलाबपुष्प व पाणी बाँटलच्या बाँक्सचे वाटप करण्यात आले.
    यावेळी पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष आर.एन.भाऊ जगताप ,माजी अध्यक्ष बाळासाहेब जगताप ,संघटक श्रीकांत ताम्हाणे,प्रसिद्धीप्रमुख केतन खळदकर,उपाध्यक्ष अविनाश कटके ,युवानेते अविनाश वायकर,भिवरी शाखाध्यक्ष योगेश कटके आदी उपस्थित होते.
     बोपदेव घाट चेकपोस्टवर पोलिस हवालदार एम.एस.सुर्यवंशी,माजी सैनिक देविदस वाबळे,शिक्षक सुनील लोणकर ,सुनील गाडे,पोलिस पाटील मनोज पायगुडे ,गृहरक्षक दल जवान ए.ए.गायकवाड ,गणेश भोसले,
       पुरंदर तालुक्यात बोपदेव घाट,दिवे घाट,मरिआई घाट,चिव्हेवाडी घाट
तोंडल,वाघापूर ,रिसेपिसे,काळदरी,पांडेश्वर,लोणंद रोड,निंबूत काँर्नर,माळशिरस,टेकवडी,,मोरगाव रोड,मांढर घाट अशा चेकपोस्ट आहेत.या सर्व चेकनाक्यावर पोलिस,माजी सैनिक,शिक्षक,पोलिस पाटील व गृहरक्षक दलाच्या जवान २४  तास कार्यरत आहेत.
      भोर - पुरंदर उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब  जाधव,तहसिलदार रुपाली सरनोबत,गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड  पोलिस निरीक्षक डी.एस.हाके,सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने,राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनखाली चेकपोस्टचे कामकाज चालू आहे.
      सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.लाखो लोक कोरोनाबाधित आहेत.असंख्य लोकांचे जीव या महामारीमुळे गेले आहेत.देशात व  महाराष्ट्रात संपूर्ण लाँकडाऊन आहे.प्रशासन लोकहितासाठी झटत आहे. अनेक घटक कोरोना प्रतिबंधासाठी लढा देत आहेत.पुरंदर तालुक्यात प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजना व नागरिकांच्या साथीमुळे पुरंदर तालुक्यात कोरोनाच्या विषाणूला थोपविण्यात यश आले आहे. चेकपोष्टवर ड्युटीवर असणारे पोलिस,माजी सैनिक, शिक्षक,गृहरक्षक दलाचे जवान  तैनात असून देशसेवा करीत आहेत.त्यांना मानसिक बळ देण्यासाठी पुरंदर तुका भाजपाच्या वतीने गुलाबपुष्प व पाणी बाँटलच्या बाँक्सचे वाटप करण्यात आल्याचे आर.एन.भाऊ.जगताप यांनी सांगितले.
      पुरंदर तालुका भाजपाच्या वतीने आम्हांला गुलाबपुष्प व पाणी बाँटल बाँक्स मिळाल्यामुळे काम करण्यात हुरुप येवून मानसिक बळ मिळाल्याचे पोलिस हवालदार एम.एस.सुर्यवंशी यांनी सांगितले.
        कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब चव्हाण यांनी केले.सुञसंचालन अविनाश कटके यांनी केले.आभार योगेश कटके यांनी मानले.

Post a Comment

 
Top