0
जेजुरी दि,३१(प्रतिनिधी)- होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी शहरात ऐतिहासिक होळकर वाड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती कोविड १९ कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियम व अटी पाळत अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली ऐतिहासिक होळकर वाड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून वन परी मंडळ अधिकारी युवराज पाचरणे व जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रबंध भिसे, यांच्या हस्ते पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, यावेळी जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संपत कोळेकर,पिसुर्टी गावचे माजी सरपंच अशोक बरकडे,बेलसरचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बुधे, समर्थ सेवा पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब लेंडे, भाजपचे प्रसाद अत्रे, अप्पा असवलीकर, यशवंत भालेराव, प्राध्यापक रंजीत खारतोडे, सेवानिवृत्त पोलिस उत्तम लेंडे, अॅड. गणेश लेंडे, गजानन बयास, लवथळेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश लेंडे,अक्षय कामथे, सचिन सुतार, किशोर खोमणे,कैलास शिंगणे, ऐश्वर्या लेंडे, राधिका लेंडे, लवथळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन रमेश लेंडे,आदि मान्यवर उपस्थित होते, जयंतीचे आयोजन अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार व तळोदा संस्थानचे जहागीरदार अमरजीतराजे बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते

Post a Comment

 
Top