0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या संपूर्ण देशभर वाढतच आहे .या आजारावर सध्या तरी कोणती खात्रीशीर लस  उपलब्ध नाही. त्यामुळे सँनिटायझरन हाथ धुणे सध्या गरजेचे आहे .यामुळे हात निर्जंतुकीकरण करण्यासाठी साबण अथवा सँनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना आरोग्य विभाग देत आहे. याच उद्देशाने जेजुरीतील श्री शिव  छत्रपती मित्र मंडळ (हिंदवी ग्रुप ) यांच्यावतीने जेजुरीतील जोशिआळी, दुर्गामाता चौक ,जानुबाई देवी मंदिर परिसर येथे नागरिकांना सँनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी दीडशे नागरिकांना याचे वाटप करण्यात आले. यावेळेस मंडळाचे प्रदीप खेडेकर ,शुभम खेडेकर,अथर्व आगलावे,विवेक खेडेकर,प्रथमेश ताकवले,अक्षय देवकर,प्रथमेश झपके ,ओम खुडे,जय खुडे,चैतन्य भोसले,संतोष साळुंखे,अभिजित कांबळे,ओमकार पोटे,गणेश साळुंखे ,ऋषिकेश  रहाटेकर, रितेश भोसले,साहिल भोसले,रुपेश नाकडे कार्यकर्ते्ते उपस्थित होते.नागरिकाकडून सदर उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

 
Top