0
पुरंदर ( प्रतिनिधी ) -   कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना केल्या आहेत. प्रथम जमावबंदी व नंतर संचारबंदी जाहीर करून लोक एकत्र येणार नाही या बाबत दक्षता घेतली.त्या नंतर जिल्हा बंदी सुद्धा करण्यात आली.अनेक ठिकाणी नाका बंदी केली मात्र तरीही  चोर मार्गाचा वापर करीत लोक जिल्हा बंदीचे सरार्स उलंघन करीत आहेत.
         कोरोना पुणे येथे आल्यानंतर अनेक दिवस सातारा जिल्हा कोरोना मुक्त होता. सातारा मध्ये पहिला रूग्ण सापडल्या नंतर सातारा व पुणे जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत.ठिक ठिकाणी तपसणी नाके तयार करण्यात आले आहेत. पोलिस रात्र-दिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.सातारमध्ये पुण्यातुन गेलेल्या लोकांमुळे कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते. त्यामुळे जिल्ह्याच्या सिमेवर पोलिस जागता पहारा देत आहेत. मात्र हा पहारा चुकवत अनेक नागरीक पुणे जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. पुणे सातारा सिमेवर निरा नदी काठी पोलिस पहारा देत असले तरी निरा नदीकाठच्या दत्तमंदीराच्या पश्चिम बाजुकडून व रेल्वे मार्गाचा उपयोग करीत लोक नीरा शहरात प्रवेश करीत आहेत. बारामती तालुक्यातील निंबुत येथील बंधारा व  पुरंदर मधिल पिंपरे व जेऊर येथिल बंधा-याचा उपयोग करून दोन्ही जिल्ह्यातील लोक आलिकडे पलिकडे करीत आहेत. लोकांचा निष्काळजीपणा करीत आपले व आपल्या आप्तजनांचे जिव धोक्यात घालत आहेत. त्याच बरोबर प्रशासकीय यंत्रणेवरचा ताणही वाढवत आहेत.खर तर कोरोनाला  शहरापुर्ताच मर्यादीत ठेवुन तिथेच  त्याचा शेवट करायचा असेल तर जनतेन स्वतःला आवरायला हवे.प्रशासनाला सहकार्य करायला हवे.व्यवसायीक  फायद्याला बाजुला ठेवत जिव वाचवण्यास किंवा कोरोनापासुन दुर राहण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हा बंदीचे उलंघन

   लाॅकडाऊन नंतर लोकांच्या दैनंदिन गरजांसाठी शासनाने काही अत्यावश्यक सेवा देणा-या लोकांना पास दिले.या पासचा दुरूपयोग होत आहे, तरकारी व फळ विक्रेते जिल्हा बंदीचे उलंघन करीत सतत फिरत आहेत.यावेळी ते सोशल डिस्टंसींन पाळताना  व मास्क वापरताना दिसत नाहीत ग्रामीण भागात फिरून तरकारी  विकणारा विक्रेता आजही तोंडाला मास्क न लावता गावोगाव फिरतो आहे.तर लोकही त्याच्या भोवताली घोळका करत आहेत.अशा लोकांपुढे शासन हतबल झाल्या शिवाय रहाणार नाही.


   अंकुश माने.(सहाय्यक पोलिस निरीक्षक जेजुरी पोलिस स्टेशन )

    लाॅकडाऊनच्या काळात लोकांनी एकत्र येवु नये म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नाका बंदी केली जातेय.तरी देखील लोक चोर वाटांचा उपयोग करून किरकोळ कारणासाठी  बाहेर पडताना दिसत आहेत.अशा लोकांना कितीही समजवले तरी काही उपयोग होताना दिसत नाही.अशा लोकांवर आम्ही कारवाई करतोच आहे.पण केवळ कारवाई करून उपयोग नाही.लोकांनी हे समजुन घ्यायला हवे की,घरा बाहेर पडुन आपण स्वतःचा व आपल्या नातलगांचा जिव धोक्यात घालत आहेत. आजची काळजी उद्याचा दिवस पहाण्याची संधी देणार आहे.हे जिवन पुन्हा नाही एवढच लोकांनी लक्षात घ्यावे.

Post a comment

 
Top