0
पुरंदर ( प्रतिनिधी ) - कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशातील देवस्थाने बंद केलेली आहेत. परंतु जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर व पायरी मार्ग बंद असूनही काही भाविक तसेच नवदांपत्य पहिल्या पायरीचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी मध्ये येत आहेत. त्यामध्ये 'रेड झोन' मधील भाविकांचाही सामावेश असल्याने जेजुरीच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यापुढे खंडोबा देवाचे दर्शनासाठी जेजुरी शहरात येणा-या भाविकांची गाडी जप्त करून पोलीस स्टेशनला
लावणेत येईल व सदर ईसमांवर प्रचलित कायदयान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील. अशी माहिती जेजुरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.
          तरी, महाराष्ट्रातील समस्त नागरिकांना जेजुरी पोलीस स्टेशन तर्फे अवाहन करण्यात येते की, यापुढे कोणीही महिन्याची वारी, नवीन लग्न झाले आहे हे कारण सांगून जेजुरीला देवदर्शनासाठी येणार नाही. यानंतरही जे नागरिक/भाविक येतील त्यांची वाहने जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे सपोनि माने यांनी सांगितले आहे.

Post a Comment

 
Top