0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मूळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे .ग्रामीण भागातील नागरीकांची उपासमार होऊ नये यासाठी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित युवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील 47 गावातील सात हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले असल्याचे प्रतिष्ठानचे अजिंक्य टेकवडे यांनी सांगितले .                              कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी,त्यावर उपाययोजना व संसर्ग टाळण्यासाठी गेली तीन माहिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे .यामुळे सर्वसामान्य विषशेता ग्रामीण भागातील गरीब कुटुंबियांचे मोठे हाल होत आहेत . या कुटुंबियांना आधार देण्यासाठी माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या पुढाकारातून अजित युवा विकास प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे केला आहे .                                                    या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरंदर हवेलीत जवळार्जुन,उदाची वाडी,वनपुरी,खानवडी,निळुंज, राख,खळद, भिवरी,चांबळी,बोपगाव,परींचे,मांडकी, पिंगोरी,आदी 47 गावात सुमारे सात हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप तहसीलदार रुपाली सरनोबत,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक डी एस हाके,सह्ययक पोलीस निरीक्षक अंकुश माने,घुगे गट विकास अधिकारी मिलिंद टोनपे आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.                                     नुकतेच जेष्ठ समाजसेविका सिंधुताई संकपाळ यांच्या कुंभारवळण येथील ममता आश्रमाला एक महिना पुरेल एवढे किराणा किट डीवायएसपी आण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव,विद्यार्थी काँग्रेसचे संदेश पवार,सरपंच अमोल कामठे,उपसरपंच दीपक जावळे,हनुमंत पवार,गणेश जगताप,अभिजित दुर्गाडे आदी उपस्थित होते . प्रतिष्ठानचे अजिंक्य टेकवडे,जनरल मॅनेजर सतीश जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले .                           

Post a Comment

 
Top