0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे .या संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसांना वाचविण्यासाठी माणसातील माणूस जागा झाला आहे . ज्या जेष्ठ, आजारी रुग्णाला औषधें उपाचारांची गरज आहे त्यांना या संकटाच्या काळात जेजुरी आरोग्य सेवा संघाने मोफत औषधें उपलब्ध करून दिली आहेत.या सेवा संघाने खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म जपला आहे असे विचार जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी व्यक्त केले . तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत गेली तीन महिने मंदिर बंद असल्याने भाविकांच्या अनुषंगाने उपजीविका असणाऱ्या नागरिक हवालदिल झाले आहेत . विषेशता जेष्ठ नागरिक,मधुमेही,उच्चरक्तदाब असणाऱ्या अनेक नागरिकांकडे औषधें घेण्यासाठी पैसे नसल्याने ते त्रस्त झाल्याचे आढळून आल्याने डॉ नितीन केंजळें,डॉ शमा केंजळें व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खाडे यांनी पुढाकार घेऊन गेली तीन महिन्यांपासून मोफत औषधें वाटप सुरु केली आहेत.याचा लाभ शहरातील 125 रुग्ण घेत आहेत . गुरुवार दि 11 रोजी जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदीर आवारात जेजुरी आरोग्य सेवा संघाच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त साहाय्यक साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते यावेळी 50 हजार रुपयांची औषधाचे वाटप करण्यात आले . यावेळी डॉ निनाद खळदकर,डॉ नितीन केंजळें,डॉ शमा केंजळें,डॉ सई खळदकर,विश्वहिंदू परिषदेचे राजेंद्र चौधरी,नितीन राऊत , शिवसेना शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे,भाजपा शहर प्रमुख सचिन पेशवे,प्रसाद अत्रे,गिरीश झगडे आदी उपस्थित होते


Post a Comment

 
Top