0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी यंदा पालखी सोहळा रद्द झाल्याने अनेक ठिकाणी पालखी सोहळ्याचे प्रतिकात्मक सोहळे काढले जात आहेत . संत सेनामहाराज पादुकांचे पूजन करून प्रतिकात्मक प्रस्थान करण्यात आले असल्याची माहिती ह भ प शाहीर विजय तावरे यांनी दिली .                           
            दरवर्षी आळंदी मधून पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी सर्व संतांचे पालखी सोहळे,तसेच दिंडी सोहळे जात असतात या सोहळ्यासाठी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर असतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी पंढरीची वारी करता येणार नसल्याने वारकरी बांधव निराश झाले आहेत . गेली पंधरा वर्षांपासून नाभिक समाजाचा संत सेना महाराज दिंडी सोहळा हभप शाहीर विजय तावरे यांच्या पुढाकारातून पुण्यातून आळंदी मार्गे पंढरपूर कडे आषाढी वारी जात असतो.
              गतवर्षापासून यादिंडी सोहळ्याचे रूपांतर पालखी सोहळ्यात झाले असून या सोहळ्यासाठी रथ तयार करून बैलजोडीही आणण्यात आली आहे . कोरोनाच्या संकटामुळे सोहळे रद्द झाल्याने शनिवार दि 13 रोजी पर्वती गाव पुणे येथे  ह भ प विजय तावरे यांच्या हस्ते  संत सेनामहाराज पादुकांचे पूजन करून प्रतिकात्मक प्रस्थान करण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top