0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष, जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक उद्योजक रवींद्र जोशी यांना यंदाचा कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव संजय सावंत यांनी सांगितले .                         
        जेजुरी उद्योजक संघाचे कार्यध्यक्ष असणारे रवींद्र जोशी यांनी संघटनेच्या माध्यमातून उद्योजक व कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सोडविन्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे . जेजुरी शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. संत सोपान काका बँकेचे सल्लागार,केबीसीचे पदाधिकारी,म्हणून ते कार्यरत आहेत . जेजुरी औद्योगिक वसाहतीतील प्रेसियस इलेक्ट्रो फ्लाक या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. मरकळ आद्योगिक वसाहतीने यापूर्वी आदर्श उद्योजक पुरस्काराने जोशी यांना गौरविले होते .
                  सामाजिक,धार्मिक,व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल रवींद्र जोशी यांना यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर तसेच प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अलका यादव यांनी सांगितले 

Post a Comment

 
Top