0
 जेजुरी ( प्रतिनिधी ) - प्रतिवर्षी आणि पारंपरिक होणारा कडेपठार मंदिरातील गणपूजा उत्सव कोरोना संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ,विश्वस्त आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला.                                             पारंपरिक कथेनुसार भगवान शिवशंकराने मणी मल्लांचा संहार करण्यासाठी  कैलासावरून या भूलोकात मार्तंड भैरवाचा अवतार घेतला त्यावेळेस कडेपठार या ठिकाणी सर्व देवगणांनी भंडारा वाहून पूजा केली तो दिवस म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गणपूजा उत्सव म्हणून साजरा केला जातो .                           
 परंतु जागतिक संकट कोरोना मुळे हा उत्सव रद्द करण्याचे ठरले असून  या वेळी जेजुरी  पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने ,कडेपठार विश्वस्थ चिंतामणी सातभाई ,रामचंद्र दिडभाई ,नितीन कदम , सचिव सदानंद बारभाई , खांदेकरी मानकरी अध्यक्ष्य गणेश आगलावे , महेश आगलावे ,रामोशी समाज अध्यक्ष्य अशोक खोमणे,वाणी समाजातर्फे राजुशेठ सोनावणे ,संतोष खोमणे भारत शेरे, नगरसेवक बाळासाहेब सातभाई , सतीश कदम ,सचिन सातभाई .ज्ञानेश्वर मोरे, आबा राऊत ,सुरेंद्र नवगिरे ,राजेंद्र मोरे  ,सुनील खोमणे ,धनंजय नाकाडे . विजय दरेकर प्रकाश भापकर ,राजू माळवदकर आदी उपस्थित होते .

Post a Comment

 
Top