0
पुणे ( प्रतिनिधी ) - सामाजिक न्याय विभागाकडून ग्रामीण व नागरी भागातील विकासकामांसाठी देण्यात येणाऱ्या निधीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघावर खैरात करण्यात आल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्याला सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक विकास योजनेतून ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातल्या २० कोटी निधीची लयलूट एकट्या बारामती तालुक्यात झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना त्यातील सगळे तालुके मिळूनही एवढा निधी देण्यात आलेला नाही. पवारांच्या राजकीय वर्चस्वामुळे वर्षानुवर्ष केंद्र व राज्य सरकारसह पुणे जिल्हा परिषदेच्या निधीचा संपूर्ण ओघ हा बारामतीच्या दिशेने वाहतो आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात या बेसुमार निधीला ब्रेक लागला होता आणि इतर तालुक्यांच्या प्रमाणातच बारामतीलाही निधी दिला जायचा. पण राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांनी बारामतीला झुकते माप दिले आहे .

जिल्ह्याला प्राप्त ३७ कोटी निधीत बारामतीला २० कोटी, शिरूर आणि आंबेगाव या दोन मतदारसंघांना प्रत्येकी १ कोटी ७५ लक्ष तर पिंपरी, जुन्नर, हडपसर, इंदापूर, भोर, वडगाव शेरी, मावळ आणि दौंड या तालुक्यांना अवघ्या दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्याला १ कोटी ४० लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top