0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  कोरोना महामारीच्या कठीण संकटात समाजासाठी अतुलनीय काम करून समाजपुढे मानवतेचा आदर्श निर्माण केल्या बद्दल जेजुरी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुरंदर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
      जेजुरी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना गडचिरोली,गोंदिया येथे कार्यरत असताना अतुलनीय सेवेबद्दल दोन वेळा राष्ट्पती पोलीस शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे .जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये एक कर्तव्यदक्ष लोकप्रिय आधिकारी म्हणून काम करताना अंकुश माने यांनी कोरोना महामारीच्या संकटात जेजुरी आणि परिसरातील बेघर,अनाथ,राज्यातील व परप्रांतीय चौदाशे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून त्यांना आधार दिला .               
           जेजुरी एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना लॉकडाऊनच्या काळात दोन वेळेचे जेवण जेजुरी देवसंस्थांन व जेजुरी उद्योजक संघ यांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी अंकुश माने यांनी पुढाकार घेतला. परप्रांतीय कामगारांना शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांच्या गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रे,तसेच बसेस व रेल्वेतून जाण्यासाठी मदत केली. या बरोबरच जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गावे कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी अंकुश माने यांनी काम करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे  या कार्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे वतीने अध्यक्ष सागर मोकाशी , काँग्रेस सोशल मीडियाचे अमित जगताप यांनी एपीआय अंकुश माने यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव केला .यावेळी साहाय्यक फौजदार शिवाजी खोकले उपस्थित होते . या कार्याबद्दल जेजुरी व परिसरातील अनेक संघटना तसेच पत्रकार संघाच्या वतीने अंकुश माने यांचा सन्मान केला आहे                                         

Post a Comment

 
Top