0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पूनम शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवेच्या आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. या यशामुळे त्यांची डीवायएसपी पदी निवड झाल्याबद्दल जेजुरी नगरपालिका व जेजुरीकर नागरिकांच्या वतीने पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला .                     
         जेजुरी नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी पूनम कदम यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .आमदार संजय जगताप यांच्या हस्ते खंडोबा देवाची प्रतिमा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. मुख्याधिकारी पूनम कदम यांचे गाव वाई तालुक्यातील बावधन असून सासर पुरंदर आहे . 2014 साली त्या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2016 ते 19 या कालावधीत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व त्यानंतर त्या जेजुरी पालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यांनी त्यात यश मिळविले आहे .                       


        या वेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी मुख्याधिकारी पूनम कदम यांनी जेजुरी पालिकेत उत्कृष्ट काम करून जेजुरी पालिकेला पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नामांकन मिळवून दिले आहे . पालिकेत जवाबदारी पार पाडून या परीक्षेत यश मिळविले हे कौतुकास्पद आहे असे सांगितले .
यावेळी नगरध्यक्षा वीणा सोनवणे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केली . पूनम कदम यांनी परीक्षेत अपयश जरी आले तरी मनाची समजूत घालून पुन्हा जिद्दीने प्रयत्न केले की यश निश्चित मिळते असे यावेळी सांगितले .         
 या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा वीणा सोनवणे ,उपनगराध्यक्ष गणेश निकुडे,गट नेते सचिन सोनवणे,नगरसेवक महेश दरेकर,सुरेश सातभाई,अजिंक्य देशमुख,गणेश शिंदे,नगरसेविका पौर्णिमा राऊत,रुक्मिणी जगताप,शीतल बयास,वृषाली कुंभार आदी उपस्थित होते .यावेळी जेजुरी पालिका प्रशासन व कर्मचारी वर्गाच्या वतीनेही मुख्याधिकारी यांचा सन्मान करण्यात आला .

Post a Comment

 
Top