0
जेजुरी ( प्रतिनिधी ) -  महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या मल्हारनगरीत नागरिकांना सर्वप्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेजुरी नगर पालिका कटिबद्ध आहे .जेजुरी शहरातील आठवडे बाजारतळावर जेजुरी शहरातील महिला,नागरिक आणि पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांसाठी आधुनिक सर्व सुविधा युक्त भाजी मंडई लवकरच सुरु होईल असे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले
 जेजुरी नगर पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण विकास निधीतून दीड कोटी रुपये खर्चाच्या आधुनिक भाजी मंडई चे व शहरातील विद्यानागर परिसरातील 55 लक्ष रुपये खर्चाच्या बंदिस्त नाल्याचे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी बोलताना आमदार संजय जगताप पुढे म्हणाले की, मल्हारी देवाच्या नगरीत नागरिकांना विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे,नवीन दोन ते तीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. शहराला वीर धरणातून कायम स्वरूपी पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे .                                 
 जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी जेजुरीच्या आठवडे बाजारात पावसाळ्यात चिखल होत असल्याने महिलांची कुचंबणा होत होती,विद्या नगर मध्ये उघडा नाला अनेक वर्षे वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पालिकेच्या वतीने हि दोन्ही कामे हाती घेतली असून चार ते पाच महिन्यात हि कामे मार्गी लागतील असे सांगितले .                 
या कार्यक्रमावेळी मुख्याधिकारी पूनम कदम, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे,गट नेते सचिन सोनवणे,नगरसेवक अजिंक्य देशमुख,महेश दरेकर, सुरेश सातभाई,गणेश शिंदे, आरोग्य विभागाच्या सभापती पौर्णिमा राऊत,बांधकाम विभागाच्या सभापती रुक्मिणी जगताप नगरसेविका शीतल बयास,वृषाली कुंभार,माजी नगर सेवक हेमंत सोनवणे,योगेश जगताप, मेहबूब पानसरे,सुशील राऊत,अनिल वीरकर, ईश्वर दरेकर,प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.   

Post a Comment

 
Top