0


 सासवड ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुक्याचे प्रमुख ठिकाण सासवड गाव आहे. सद्या सासवडला कोरोना रुग्णांची संख्या 60 च्या वर गेली असुन तालुक्याची संख्या 98 वर गेली आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सासवडमध्ये १० आँक्सिजन युक्त बेड व ३ व्हेंटिलेटर बेड असलेल्या कोविड सेंटरची अत्यंत गरज असून त्या दृष्टीने कोविड सेंटरची लवकरात लवकर उभारणी करण्यात यावी अशी मागणी सासवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे. व तसे निवेदन खा.सौ सुप्रियाताई सुळे व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांना पाठविण्यात आले आहे..
        सासवड ( ता. पुरंदर )
या संत सोपानकाकांच्या पावनभूमी मधे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा शिरकाव झालेला असून सासवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत  झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सासवड कोरोना पासून सुरक्षीत समजून बाहेरील लोक सासवडमधे मोठ्या प्रमाणात घुसखोरी करीत असून प्रशासनास कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत.
          सासवड पुणे शहर जवळ असल्याने बहुतेक नागरीक नियम झुगारुन तेथे दररोज ये जा करतात. मुंबई -पुण्या सारखी परिस्थिती या ठिकाणी उद्भवण्या आधीच योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सासवडच्या सर्व बाजूंनी ८ ते १० दिवसांसाठी कडकडीत नाकाबंदी व्हावी अशा विविध मागण्यांचे निवेदन आ. संजय जगता यांना देण्यात आले असल्याचे सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गिरमे यांनी सांगितले.
        यावेळी बाळासाहेब भिंताडे, कलाताई फडतरे, महेश जगताप, सयाजी वांढेकर, नवनाथ बोरावके आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top