0
पुरंदर ( प्रतिनिधी ) -
पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी लोकडाऊन चे तंतोतंत पालन करणे बाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हाके साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे ट्राफिक विभागाचे पोलीस नाईक ज्योतिबा भोसले व पथकाने दि. 15 मार्च ते 13 जुलै या लॉकडाऊन च्या काळात सासवड पोलीस स्टेशन कडून 5,665 वाहनावर कारवाई करून 13 लाख 50 हजार 100 रु दंड आकारण्यात आला आहे. तसेच लोक डॉन चे उल्लंघन करून विनाकारण फिरणार, वीना मास्क फिरणारं विरुद्ध भादवि कलम 188 अन्वये 389 गुन्हे दाखल केले आहे. तसेच दारूबंदीची 35 केसेस, जुगार 2 गुन्हे दाखल केले आहे.   फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 प्रमाणे अद्यापपर्यंत 16 इसमंना हद्दपार करण्यात आलेले आहे.
       सदरची कामगिरी सासवड पोलिस स्टेशनचे स. पो. फो काळभोर, पो. हवा. माने, चीखले, गोडसे, कोकरे, पो.ना. अजित माने, खरात, कोल्हे, पो. शि, सरक, प्रतीक धिवार, निलेश जाधव, दत्ता जाधव, होमगार्ड,   ग्रामरक्षक दलाची सदस्य यांनी केली आहे.(प्रतिनिधी - निखिल जगताप)

Post a Comment

 
Top