0
भोर ( प्रतिनिधी ) - कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या भोर तालुका अध्यक्षपदी प्रदीप ‌प्रकाश लिमण तसेच कार्याध्यक्षपदी सौरभ खुटवड यांची आज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष प्रविण भैय्या आजबे, संघटक श्रीकांतजी राजपूत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी कंक, पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील चांदगुडे-पाटील व पुणे उपजिल्हाध्यक्ष कुणाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली.
भोर तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून कृषी पदवीधर युवक तसेच शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली.
अध्यक्ष प्रदीप लिमण हे भोर वकील संघटनेचे मा.अध्यक्ष व पारवडी ‌गावचे चे आदर्श सरपंच अॅड. प्रकाश एम. लिमण यांचे सुपुत्र आहेत.

Post a Comment

 
Top