0
सासवड ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतःच्या घरी सुरक्षित राहून घराजवळ वृक्षलागवड केली. यात महाविद्यालयाच्या २०० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार व प्रशासकीय सहसचिव ए. एम. जाधव यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. तसेच  महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. राजश्री चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्मिता पवार पदवी विभाग व प्रा. एच. एस. पाटील पदविका विभाग यांनी या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने नियोजन केले.


Post a Comment

 
Top