0
सासवड ( प्रतिनिधी ) -  राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी येथील ५० विद्यार्थ्यांनी ना.अजितदादा पवार- पुरोगामी व दूरदर्शी नेतृत्व,  कोविड १९- संधी आणि आव्हाने,ई - लर्निंग काळाची गरज  या विविध विषयांवर निबंध सादर करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार व प्रशासकीय सहसचिव ए. एम. जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले.   या स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. राजश्री चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रज्ञा जगताप पदवी विभाग व प्रा.  दिपाली जगताप पदविका विभाग यांनी ऑनलाईन पद्धतीने  केले.

Post a Comment

 
Top