3
जेजुरी ( प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडकोट पायरीमार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा  सुमारे१२ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण होत असून ,राज्यातील स्थिती पूर्वपदावर येताच आणि भाविकांसाठी मंदिरे खुली होताच  मान्यवरांचे हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.या कामासाठी सुमारे ४०लक्ष रुपये खर्च होणार असून पायरीमार्गावर दगडी चौथरा व त्यावर १२फूट उंचीचा ब्राँझ धातूचा  पुतळा उभारण्यात येणार आहे. मूळचे जेजुरीवासीय शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलासंस्कार आर्ट या संस्थेकडून हे काम पूर्ण करण्यात येत आहे .जेजुरीच्या खंडेरायाचे निस्सीम भक्त म्हणून होळकर घराण्याचा येथें मोलाचा वाटा आहे.
जेजुरी शहराच्या जडणघडणीमध्ये होळकर घराण्याचे मोठे योगदान आहे .जेजुरी गडकोट आवाराचे बांधकाम,पिण्याचे पाण्यासाठी ऐतिहासिक होळकर तलाव ,मल्हार गौतमेश्वर मंदिर ,भाविकांच्या सोईसुविधेसाठी चिंचेच्या बागेची निर्मिती आदी त्यांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक वास्तू शहराच्या वैभवात भर घालतात ,जेजुरी नगरीच्या विकासाच्या खऱ्या शिल्पकार साध्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक अथवा पुतळा शहरात व्हावा अशी क्रित्येक समाजबांधव व विविध संघटनांची मागणी होती . या मागणीचा विचार करून श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पुतळ्याचे काम हाती घेतले असून राज्यातील परिस्थिती पुर्वपदावर येताच आणि भाविकांसाठी मंदिरे खुली होताच गडकोट आवाराच्या पायरीमार्गावर मान्यवरांचे हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे ,अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.

Post a Comment

  1. Murti Karachi Mahiti milel la?

    ReplyDelete
  2. हो मूर्ती बनवून मिळेल ,आहिल्या मूर्ती आर्ट ,श्रीकांत वाघमोडे,मो,नो,+917507608484

    ReplyDelete
  3. आहिल्यादेवीचा पुतळा हा ,राजराणीने जितक्या वर्ष राज्य केले तितक्या फुटाचा पुतळा बनविला पाहिजे,

    ReplyDelete

 
Top