0

 पुरंदर ( प्रतिनिधी ) -  पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे येथील रहिवासी किसन काळे यांचा त्यांचा जावई सुरेश भोसले यांनी दोन दिवसा पूर्वी चाकूने भोसकून खून केला होता.खून करून फरारी झालेल्या या जावयाला पोलिसांनी जेरबंद केले
   आज (दि.10) रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत पुणे ते सोलापूर रोडने LCB पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून जेजुरी नजीक नाझरे सुपे येथे सासऱ्याचा खून करून फरार झालेला आरोपी सुरेश सदाशिव भोसले वय 40 वर्षे  हा  मिरवडी ता. दौंड जि. पुणे येथे आला असल्याचे  समजल्याने  त्यास मौजे मिरवडी ता. दौंड येथून सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेतले .त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. असून त्यास पुढील तपासकामी वैद्यकीय तपासणी करून जेजुरी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात  देण्यात आले  आहे.  ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे,सफौ.दत्तात्रय जगताप , श्रीकांत माळी,चापोहवा राजापूरे, विजय कांचन , धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके  यांनी केली आहे .
    भोसले याने आपली बायकोच्या माहेरी मौजे नाझरे-सुपे ता. पुरंदर जि.पुणे येथे जाऊन बायको आपल्याकडे नांदायला येत नाही म्हणून चिडून जाऊन भांडण करून त्याचे पत्नीचे वडील म्हणजेच त्याचे सासरे  किसन देशा काळे (वय 60 )वर्षे यास चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून पळून गेला होता.याबाबतची तक्रार किसन काळ यांच्या मुलाने जेजुरी पोलीस स्टेशनला दिली आहे.त्याला २४ तासात जेरबंद  करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Post a Comment

 
Top