0

 पुणे ( प्रतिनिधी ) - भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आलि आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे  विश्वासू सहकारी म्हणून शेवाळे यांची ओळख आहे याच पार्श्वभूमीवर त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. राहुल शेवाळे यांंनी पुरंदर मध्ये राजकीय क्षेत्रात उत्तम व उल्लेखनीय कार्य केलेले आहे.सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सहकारी म्हणून काम करणे अशी शेवाळे यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी राहुल शेवाळे यांची निवड केलेली आहे. राहुल शेवाळे यांच्यावर पक्ष संघटना मजबुत करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्याकडून पक्ष संघटनेचे चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे.  

Post a Comment

 
Top