0

 वाळूज ( प्रतिनिधी ) - गामी इंडस्ट्रीलय पार्क पावले MIDC नवी मुंबईतील काही इसम कोव्हीडच्या रुग्णाचे उपचार करतांना डॉक्टर कडून वापरात आलेले निळ्या रंगाचे रबरी हातमोजे नष्ट करणे आवश्यक असताना बेकायदेशीरपणे ते पुन्हा वापरण्यासाठी फसवणुकीच्या उद्देशाने ते लिक्वीड सोप व अन्य केमिकल्सने वाशिंग मशीनमध्ये धुवून वाळवून पुन्हा नवीन पॅकेट तयार करत आहे.अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन नमुद ठिकाणी नवी मुंबई येथील कक्ष-१ गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम व त्यांच्या टिमने छापा टाकला व इसम नामे प्रशांत अशोक सुर्वे रा. सेक्टर-९, सिबीडी बेलापुर याचे ताब्यातुन डॉक्टरांनी वापरलेले बिन धुतलेले व धुतलेले एकुण ०४ लाख नग वैद्यकिय वापराचे निळ्या रंगाचे रबरी हातमोजे तसेच ग्राहकाला फसवुन विक्री करण्यासाठी पॅकेट्समध्ये बंद केलेले निळ्या रंगाचे रबरी हातमोज्याचे १७ पॅकेट्स व इतर साहित्य असा एकुण ६,१०,७२०/- रु. मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीस ठाणे तुर्भे, नवी मुंबई येथे गुरनं.३१६/२०२० कलम ४२०,१८८,२७०,३३६ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान औरंगाबाद एम.आय.डी.सी येथे सुध्दा संबंध असल्याचे दिसुन आल्याने सहा.पोलीस निरीक्षक राहुल राख, गुन्हेशाखा, कक्ष-१ नवी मुंबई व त्यांचे पथक पुढील तपास कामी पो.स्टे.एम.वाळुज येथे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना भेटले व गुन्हयातील इतर आरोपी शोध घेण्यासाठी पो.स्टे.एम.वाळुजचे सपोनि घेरडे, सपोनि वावळे व डी.बी.पथकातील कर्मचारी यांना मदतकामी दिले. त्यावरुन नवी मुंबई पोलीस व पो.स्टे.एम.वाळुजचे अधिकारी व कर्मचारी यांनी समांतर तपास करुन आरोपी नामे शेख अफरोज शेख इनायत यांचा शोध घेतला व त्यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गट नं.१३, प्लॉट नं.१८५, साजापुर येथे एका गोडवुन मध्ये ठेवलेले सर्जिकल हातमोज दाखविले. सदरचा माल अंदाजे १९ टन असुन नवी मुंबई पोलीसांनी पंचनामा करुन सदर गोडावुन सिलबंद करण्यात आले आहे. ( प्रतिनिधी अनिकेत घोडके , महाराष्ट्र वार्ता वाळूज औरंगाबाद ) 


Post a Comment

 
Top